नागपूर, दि. 9 : राष्ट्रीय
सण तसेच महत्त्वाच्या सांस्कृतिक कार्यक्रमात प्लास्टिक व कागदी राष्ट्रध्वजाचा
वापर करु नका असे आवाहन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी केले आहे.
प्लास्टिक व कागदी राष्ट्रध्वज निर्मिती शासनाच्या 1
जानेवारी 2015 च्या शासन निर्णयानुसार
पायबंद घालण्याच्या त्याचे उत्पादन, वितरण व विक्रेते यांच्यावर संबंधित विभागाने
कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. राष्ट्रध्वज कार्यक्रमानंतर मैदानात अथवा रस्त्यावर पडलेले असतात. त्यामुळे
राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. हे टाळण्यासाठी उच्च न्यायालयाने जनहित याचिकेवर
निर्णय देताना प्लास्टिक व कागदी राष्ट्रध्वज वापरावर बंदीचा निर्णय दिला आहे.
त्यामुळे येत्या 1 मे महाराष्ट्र दिनी प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करुन
नये, असे आवाहन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल
यांनी केले आहे.
राष्ट्रध्वजाचा अवमान होवू नये यादृष्टीने कार्यक्रम संपल्यानंतर
ठीक-ठिकानी राष्ट्रध्वज गोळा करुन त्याची
योग्य विल्हेवाट लावण्याच्या सूचना न्यायालयाने दिल्या आहेत. खराब झालेले
राष्ट्रध्वज पिशवी किंवा कापडामध्ये व्यवस्थित बांधून सूर्यास्तानंतर व
सूर्योदयापूर्वी जिल्हाधिकारी व तहसील कार्यालयामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या
देखरेखीखाली नष्ट करण्यात यावे. व तसे करताना सर्वांनी उभे राहावे व ते पूर्णपणे
जाळून नष्ट होईपर्यंत कोणीही जागा सोडू नये, असे निर्देश देण्यात आले आहेत.
रस्त्यावर पडलेले राष्ट्रध्वज गोळा करण्याकरिता जिल्ह्यातील
सामाजिक संघटना, नागरिक, विद्यार्थी यांनी सहकार्य करावे व जमा करण्यात आलेले
राष्ट्रध्वज जिल्हाधिकारी किंवा संबंधित तहसील कार्यालयात सुपूर्द करावे, असे
आवाहन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी
जनतेला केले आहे.
****
No comments:
Post a Comment