नागपूर, दि. 9 : भारत निवडणूक आयोगाने रामटेक
लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी पंडित जवाहरलाल नेहरु मार्केट यार्ड, चिखली ले आऊट
कळमना येथे करण्याच्या प्रस्तावास मान्यता दिली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी
तथा अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत फडके यांनी दिली.
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या
पहिल्या टप्प्यात विदर्भातील सात लोकसभा मतदारसंघाचे मतदान गुरुवार दि. 11
एप्रिल रोजी होत असून, रामटेक लोकसभा मतदारसंघाचा त्यात समावेश आहे. मतमोजणी
गुरुवार दि. 23 मे रोजी सकाळी 8 वाजता सुरु होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
*****
No comments:
Post a Comment