Friday, 6 December 2019

शासकीय निवृत्ती वेतनधारकांना सूचना

          नागपूर, दि. 6 :  1 जानेवारी 2016 पूर्वीचे तसेच 1 जानेवारी 2016 नंतर सेवानिवृत्त तसेच कुटुंब निवृत्तीवेतन घेणाऱ्या निवृत्तीवेतन धारकांचे सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार निवृत्ती वेतन तसेच कुटुंब निवृत्तीवेतन सुधारित करुन दिनांक 31 डिसेंबर 2018 पर्यंतच्या कालावधीतील थकबाकीची रक्कम शासन निर्णयानुसार 5 समान हप्त्यात प्रत्येक वर्षीच्या जून महिन्याच्या निवृत्तीवेतनासोबत आणि 1 जानेवारी 2019 पासून रोखीने याप्रमाणे अदा करावयाची आहे.
अदा करण्यात आलेल्या थकबाकीच्या विवरणपत्राची मागणी मोठ्या प्रमाणात निवृत्तीवेतनधारकांकडून होत आहे. परंतु. सध्या निवृत्तीवेतनधारक हयात असल्याचे प्रमाणपत्रातर कार्यवाही करण्याचे तसेच आयकर गणना करण्याचे काम प्राधान्याने मोठ्या प्रमाणावर सुरु असल्यामुळे  हे काम माहे फेब्रुवारी 2020 अखेरपर्यंत सुरु राहणार आहे. त्यामुळे वाढीव निवृत्तीवेतनानुसार देय थकबाकी रकमेचे विवरणपत्र निवृत्ती वेतनधारकांना देणे शक्य होणार नसल्याचे वरिष्ठ कोषागार अधिकारी, नागपूर यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.
निवृत्त वेतनधारकांनी थकबाकी विवरणपत्राची मागणी फेब्रुवारी 2020 नंतर केल्यास विवरणपत्रे कोषागार कार्यालयाडून दिल्या जातील. तरी सर्व निवृत्ती वेतनधारक तसेच कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी नोंद घ्यावी,  असे आवाहन वरिष्ठ कोषागार अधिकारी यांनी केले आहे.
****

No comments:

Post a Comment