Thursday, 12 December 2019

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब घेतले आई एकवीरेचे दर्शन


पुणे, दि. 12 : मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब आपले कुलदैवत असलेल्या वेहेरगाव कार्ला येथील आई एकवीरेचे दर्शन घेतले. त्यांच्या समवेत पत्नी सौ. रश्मी ठाकरे, पुत्र आ. आदित्य ठाकरे होते.मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री श्री.ठाकरे हे आपले कुलदैवत असलेल्या देवीच्या दर्शनासाठी आले.
यावेळी मावळचे खासदार श्रीरंग बारणे, आमदार सुनील शेळके, माजी महापौर अनंत तरे, मदन भोई, नवनाथ देशमुख, विलासराव कुटे, कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुहास वारके, अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, प्रांताधिकारी संदेश शिर्के, तहसिलदार मधुसूदन बर्गे व इतर उपस्थित होते. दर्शनानंतर मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांचा देवस्थानच्या वतीने सत्कार करण्यात आला.
0000

No comments:

Post a Comment