Thursday, 12 December 2019

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी मतदारांनी पुढाकार घ्यावा - राजलक्ष्मी शहा

                                                         
नागपूर दि. 12: भारत निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2020 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा अद्ययावत करण्याचा विशेष संक्षिप्त कार्यक्रम घोषित केला आहे. मतदार यादी अद्ययावत व शुध्द होण्याच्या हेतूने, मतदार याद्यांचे पुनरिक्षण प्रत्यक्षात सुरु करण्यापूर्वी शुक्रवार, दिनांक 20 डिसेंबर या कालावधीत मतदार पडताळणी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. याद्वारे मतदारांकडून स्वयंस्फूर्तीने  NVSP.IN या पोर्टलवरुन प्राप्त ऑनलाईन माहिती आणि मतदार केंद्रस्तरीय अधिकारी यांच्या वतीने प्रत्यक्ष पडताळणीच्या आधारे प्राप्त झालेले नमुने / Online BLO Apps वरुन अपलोड केलेल्या मतदारांच्या तपशिलाची पडताळणी व प्रमाणीकरण करण्यात येवून ती दुरुस्ती मतदार यादीत करण्यात येणार आहे.
मतदाराच्या तपशीलाची पडताळणी आणि दुरुस्ती असल्यास, त्याचा तपशील, यामध्ये छायाचित्र देखील समाविष्ट आहे तसेच नोंदीची प्रमाणीकरण करणे, मतदाराच्या कुटुंबाचा तपशील प्राप्त करुन घेणे तसेच नोंदीची पडताळणी करणे, मतदारास निवडणूक विषयक अधिक चांगल्या सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी मतदारांचा संपर्क तपशील प्राप्त करुन घेणे, विद्यमान तसेच संभाव्य मतदार केंद्राचा तपशील प्राप्त करुन घेणे, मतदार यादी अद्यावत व शुध्द करणे, निवडणूक विषयक सेवामध्ये सुधारणा करणे, ही मतदार पडताळणी कार्यक्रमाची उद्दिष्ट्ये आहेत.
मतदार त्यांच्या तपशीलाची पडताळणी व्होटर हेल्पलाईन मोबाईल ॲप, राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टल (NVSP), सामायिक सेवा केंद्र (CSCs) यास भेट देऊन, मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयाशी सलग्न मतदार सुविधा केंद्रास भेट देऊन, दिव्यांग मतदार व्होटर हेल्पलाईन (1950) वर संपर्क साधावा.
तरी सर्व मतदारांनी वरील सुविधांच्या आधारे त्यांच्या तपशीलाची तसेच तपशीलामध्ये छायाचित्र व नोंदीबाबत दुरुस्ती असल्यास त्याची पडताळणी करावी. जेणेकरुन मतदार यादी अद्यावत व शुध्द करण्याच्या प्रक्रियेत आपला सुध्दा सहभाग नोंदविता येईल, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती राजलक्ष्मी शहा यांनी केले आहे.  
*****

No comments:

Post a Comment