Sunday, 15 December 2019

जनतेच्या आशा आकांक्षा पूर्ण करणार शेतकरी कर्जमुक्तीसोबतच चिंतामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरु - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे





नागपूरदि. 15 : जनतेच्या आशीर्वादाने आणि पाठबळावर हे सरकार आले असून त्यांना दिलेली वचने व त्यांच्या आशा-आकांक्षा पूर्ण करुअशी ग्वाही देतानाच राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तच नाही तर चिंतामुक्त करण्याच्या दिशेने वाटचाल सुरु असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे सांगितले.
            विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला रामगिरी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते. वित्त मंत्री जयंत पाटीलमहसूल मंत्री बाळासाहेब थोरातगृहमंत्री एकनाथ शिंदेउद्योग मंत्री सुभाष देसाईग्रामविकास मंत्री छगन भुजबळसार्वजनिक बांधकाम (सार्व.उपक्रम वगळून) डॉ.नितिन राऊतआमदार अशोक चव्हाणदिवाकर रावते आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणालेनागपूर मध्ये मुख्यमंत्री म्हणून प्रथमच आलो आहे. राज्याच्या उपराजधानीत उद्यापासून सुरु होणाऱ्या विधीमंडळाच्या अधिवेशनापासून मुख्यमंत्री म्हणून कारकिर्द सुरु होत आहे. राज्यातल्या माता-भगिनींच्या शुभेच्छात्यांचे आशीर्वाद हे आमचं पाठबळ असून त्या शक्तीच्या जोरावर जनतेच्या अपेक्षा पूर्ण करुअशी ग्वाही श्री.ठाकरे यांनी यावेळी दिली.
अधिवेशनाच्या माध्यमातून संपूर्ण राज्यातील जनतेला त्यांच्या प्रश्नांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार असून शेतकऱ्यांना कर्जमुक्तच नाहीतर चिंतामुक्त करण्याच्या दिशेने पाऊले टाकीत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. जनतेला दिलेली वचने पूर्ण करणार असून त्यांच्या प्रश्नांना कृतीतून उत्तरे देऊ असेही त्यांनी सांगितले. राज्यातील कुठल्याही विकासकामांना स्थगिती दिली नाहीअसेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
000000

No comments:

Post a Comment