नागपूर, दि. 15: महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आज मुंबई येथून विशेष विमानाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. यावेळी विमानतळावर त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांच्या समवेत आमदार आदित्य ठाकरे यांचेही आगमन झाले.
विमानतळावर सार्वजनिक बांधकाम मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. खासदार कृपाल तुमाने, श्रीमती भावना गवळी, आमदार आशिष जैसवाल, संजय राठोड, माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, विभागीय आयुक्त डॉ. भूषण कुमार उपाध्याय, विशेष पोलीस महानिरीक्षक के.एम. मल्लिकार्जुन प्रसन्ना, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, महापालिका आयुक्त अभिजित बांगर, महानगर आयुक्त शीतलउगले-तेलीआदी पदाधिकारी उपस्थित होते.
विमानतळावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी लोकप्रतिनिधी, विविध संस्थांचे पदाधिकारी तसेच नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. मुख्यमंत्र्यांनी नागरिकांच्या स्वागताचा स्वीकार केला. या स्वागत समारंभाला गृहमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, खासदार गजानन किर्तीकर, माजी खासदार आनंदरा व अडसूळ, प्रकाश जाधव, जिल्हा प्रमुख राजेंद्र हर्णे, संदीप इटकेलवार, किशोर कान्हेरे तसेच विविध पक्षांचे पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0000

No comments:
Post a Comment