Saturday, 7 December 2019

सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ

                    पुणे दि. 7 : राजभवन येथे राज्य  सैनिक कल्याण विभागाच्यावतीने आयोजित सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी प्रधानमंत्री मोदी यांनी शहीद जवान कुणाल गोसावी यांच्या वीरपत्नी उमा व मुलगी उमंग यांच्याशी संवाद साधला.
            यावेळी लेफ्टनंट कर्नल  श्री. आर. आर. जाधव,  शहीद जवान कुणाल गोसावी यांच्या वीरपत्नी श्रीमती उमा कुणाल गोसावीमुलगी उमंग कुणाल गोसावी,  नाईक श्री. नंदकुमार चावरे,  सुभेदार श्री. संजयकुमार मोहिते,  एनसीसी अधिकारी श्री. बाळासाहेब शिंदे,  एनसीसी  विद्यार्थी  अमंग रुपेली,  संकेत कदमविजयश्री सुरदे,  प्रीती जगदाळे आदी उपस्थित होते.
000000



No comments:

Post a Comment