प्र. प. क्र. 68 दिनांक 22 जानेवारी 2020
नागपूर, दि. 22 : जिल्हा विधी व सेवा प्राधिकरणाचे वतीने ‘बालिका दिवसा’निमित्त कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाचे शुक्रवार, दिनांक 24 जानेवारी 2020 रोजी दुपारी 3 वाजता देवडिया हायस्कूल, नंगा पुतळा चौक, गांधीबाग, नागपूर येथे आयोजन करण्यात आले आहे.
या जनजागृती कार्यक्रमामध्ये स्वास्थ्य, स्वच्छता व सुरक्षा, लैंगिक छेडछाड, बाल न्याय अधिनियम-2015, संविधान जनजागृती कार्यक्रमांतर्गत मूलभूत कर्तव्य, शिक्षणाचा अधिकार व पोक्सो ॲक्ट या विषयांवर मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.
कृपया या जनजागृती कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त संख्येने नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव अ. ग. देशमुख यांनी केले आहे.
****
No comments:
Post a Comment