Wednesday, 22 January 2020

शिष्यवृत्तीचे प्रस्ताव सादर करण्यास 30 जानेवारीपर्यंत मुदतवाढ


नागपूरदि.22 :  सामाजिक न्याय विभाग व इमाव, विजाभज व विमाप्र कल्याण विभागाद्वारे राज्यातील अनुसूचित जाती व जमाती, भटक्या जाती व जमाती, विशेष मागासवर्गीय प्रवर्ग व इतर मागासवर्गीय इत्यादी प्रवर्गातील शोलय शिक्षण घेणाऱ्या 5 वी ते 10 वीच्या विद्यार्थ्यांसाठी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती, अस्वच्छ व्यवसाय करणाऱ्या पालकांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती, 9 वी व 10 वी भारत सरकार शिष्यवृत्ती, गुणवत्ता शिष्यवृत्ती, 10 वी परिक्षा शुल्क परत, डॉ. आंबेडकर मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती, 1 ली ते 10 वी पर्यंतच्या इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती, दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजनेचे प्रस्ताव सादर करण्याकरिता 30 जानेवारी 2020 पर्यंत अंतीम मुदतवाढ देण्यात आली असून मान्यताप्राप्त शाळांनी मुदतीच्या आत परिपूर्ण प्रस्ताव आवश्यक कागदपत्रासह जिल्हा समाज कल्याण कार्यालयात सादर करण्याचे आवाहन जिल्हा परिषेच्या समाज कल्याण अधिकारी श्रीमती सुकेशिनी तेलगोटे यांनी केले आहे.

******

No comments:

Post a Comment