नागपूर, दि. 23 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळांतर्गत मान्यताप्राप्त शाळांमध्ये अदयापही इयत्ता दहावी च्या काही विद्यार्थ्यांची कलमापन चाचणी व अभिक्षमता चाचणी घेण्यात आली नाही. ज्या मान्यताप्राप्त शाळांमध्ये इयत्ता दहावी च्या विद्यार्थ्यांची घेण्याचे निर्देश विभागीय मंडळाने दिले आहेत.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे आणि शामची आई फाउंडेशन यांच्यातील सामंजस्य करारानुसार इयत्ता 10 वी च्या विद्यार्थ्यांसाठी कलमापन चाचणी व अभिक्षमता चाचणी आयोजित करण्यात आली आहे. या चाचणीला परत मुदतवाढ मिळणार नसल्याचे विभागीय मंडळाचे विभागीय सहाय्यक सचिव व्ही. एच.जोग यांनी कळविले आहे.
No comments:
Post a Comment