Thursday, 23 January 2020

“निर्यातक्षम संत्रा उत्पादन व निर्यात वृद्धी” विषयावर बुधवारी कार्यशाळा

नागपूर,दि.23 राज्य कृषि पणन मंडळामार्फत संत्रा निर्यातीस चालना देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळामार्फत बुधवारी (दि.29) रोजी संत्रा निर्यात सुविधा केंद्रकारंजा (घा) वर्धा येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
         निर्यातक्षम संत्रा शेतमालाचे उत्पादन व निर्यातवृद्धी या विषयावर संत्रा  उत्पादक  शेतकरी,  निर्यातदार,  प्रक्रियादार,  शेतकरी गट,  शेतकरी  उत्पादक  कंपनी यांच्यासाठी एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेस कृषि विभागाशी संबंधित केंद्र व राज्य शासनाच्या विविध विभागातील अधिकारी, विविध तज्ञ संत्रा फळपिकावर मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या कार्यशाळेला उपस्थित राहावेअसे आवाहन  महाराष्ट्र  राज्य  कृषि  पणन  मंडळाचे उप सरव्यवस्थापक एम. एस. गवळे यांनी केले आहे. 
       कार्यशाळेत डॉ. एम. एस. लदानियाश्रीधर ठाकरेरविंद्र भोसलेअनिल इंगळेमिलींद शेंडे गौतम वालदेअजय कडूनिशांत शेंडे आणि मच्छिंद्र गवळे हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
                                                                                 ******

No comments:

Post a Comment