नागपूर, दि. 23 : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे सोमवार (दिनांक 27) रोजी दुपारी 1.05 वाजता मुंबई येथून नागपूर विमानतळावर आगमन होईल. त्यानंतर मोटारीने राजभवनकडे प्रयाण करतील. दुपारी 1.40 वाजता राजभवन येथे आगमन व राखीव.
राजभवन येथून दुपारी 5.20 वाजता रामदास पेठ येथील हॉटेल सेंटर पॉईंटकडे प्रयाण करतील. दुपारी 5.30 वाजता राज्यपाल भगत सिंह कोश्यारी हे लोकमत टाईम्सच्या कार्यक्रमास उपस्थित राहतील. सायंकाळी 6.30 वाजता हॉटेल सेंटर पाईंट येथून राजभवनकडे प्रयाण करतील. सायंकाळी 6.40 वाजता राजभवन येथे त्यांचे आगमन व राखीव. सायंकाळी 7.40 वाजता राजभवन येथून मोटारीने नागपूर विमानतळाकडे प्रयाण करतील. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी हे रात्री 8.40 वाजता नागपूर येथून विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील.
*****
No comments:
Post a Comment