दिड लाखाहून अधिक बालकांना दिली पोलिओ लस
नागपूर, दि.21 : राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत गेल्या रविवारी 2563 बुथवर 1 लाख 88 हजार 634 बालकांना जिल्हयात ग्रामीण भागात लस देण्यात आली. या मोहिमेचे जिल्हास्तरीय उद्घाटन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती रश्मी बर्वे यांच्या हस्ते आरोग्य केंद्र कन्हान येथे करण्यात आले.
लसीकरण मोहिमेतून ग्रामीण भागात सुटलेल्या बालकांना 21 जानेवारीपासून 3 दिवस व शहरी भागात सलग 5 दिवस घरोघरी जावून पोलिओ लस पाजण्यात येणार आहे. पोलिओ लसीपासून एकही बालक वंचित राहू नये यासाठी जिल्हयात 958 ट्रांझिट चमूद्वारे बस स्टँड, रेल्वे स्टेशन, धार्मिक स्थळे इत्यादी ठिकाणी आणि 367 मोबाईल चमूद्वारे कामगार, भटके लोक, रस्त्यावरील मजुरी करणाऱ्या लोकांची मुले यांना पोलिओ लस पाजण्यात येणार आहेत.
सर्व नागरिकांनी आपल्या 0 ते 5 वर्ष वयाच्या बालकांना यापूर्वी पोलिओ लस दिली असली तरी या मोहिमेमध्ये पोलिओ लसीकरण करुन घ्यावे आणि मोहिम यशस्वी करण्याकरिता सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिपक सेलोकर व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवेंद्र पातुरकर यांनी केले आहे.
******
No comments:
Post a Comment