Wednesday, 22 January 2020

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने रोजगार मेळावा संपन्न


             
            नागपूर, दि.22 : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता  मार्गदर्शन केंद्र आणि एस. एस. इंटरनॅशनल स्कुल यांच्या संयुक्त विद्यमाने नामांकित कंपन्यामधील नोकरभरतीसाठी ‘पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा एस. एस. इंटरनॅशनल स्कुल, गोटाळ पांजरी, बेसा रोड येथे नुकताच संपन्न झाला.
             जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नागपूरचे सहाय्यक आयुक्त हरडे, एस.एस. इंटरनॅशनल स्कूलचे संचालक श्री. येनुरकर, अधिकारी- कर्मचारी, गोटाळा पांजरीचे सरपंच, उपसरपंच आदी उपस्थित होते.
             रोजगार मेळाव्यामध्ये सुमारे 525 बेरोजगार युवक-युवतींची नावे नोंदविण्यात आली होती. त्यापैकी अंदाजे 190 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली. या मेळाव्यात मेसर्स निम डी. एम.सी.एफ.एस. कामठी, विरोहन इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ ॲन्ड मॅनेजमेंट सायन्स, दिनशॉ डेअरी फुड्स, मेटललॅब हायटेक नागपूर, हल्दीराम फुड्स इंटरनॅशनल, रॅडिसन ब्ल्यू हॉटेल, सिम्प्लेक्स आयर्न स्टील, गंगा केअर हॉस्पिटल, उत्कर्ष स्मॉल फाईनान्स बँक, जीवन विमा निगम, युरेका फोर्ब्स आदी कंपन्यांच्या प्रतिनिधींनी भाग घेतला होता.
             
*****

No comments:

Post a Comment