Tuesday, 12 May 2026

१३ मे #दिनविशेष

सुप्रसिद्ध मराठी चित्रपट व नाटकांचे संगीतकार व संगीत दिग्दर्शक #आनंदमोडक यांचा आज जन्मदिन.त्यांचा जन्म अकोला येथे झाला.‘महानिर्वाण’ हे त्यांनी संगीत दिलेले पहिले नाटक.‘तीन पैशाचा तमाशा’,‘पडघम’ आदी नाटक तसेच 'कळत नकळत','एक होता विदूषक', 'हरिश्चंद्राची फॅक्टरी'  आदी ५३मराठी व हिंदी चित्रपटांना त्यांनी संगीत साज चढवला.




 प्रख्यात समीक्षक डॉ.#भालचंद्रदिनकरफडके यांचा जन्मदिन.‘कथाकार खानोलकर’,‘दलित साहित्य: वेदना आणि विद्रोह’,‘मराठी लेखिका: चिंता आणि चिंतन’या त्यांच्या पुस्तकांमुळे त्यांच्यावर ‘समीक्षक’ही मुद्रा उमटली.सहा कथाकार,समुद्राकाठची रात्र आदी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत.

No comments:

Post a Comment