साहित्य मीमांसक,कवी व विचारवंत #रामचंद्रश्रीपादजोग यांचा जन्मदिन.'अभिनव काव्यप्रकाश' हा त्यांचा पहिला ग्रंथ. 'ज्योत्स्रागीत','निशागीत','साराच वेडेपणा' आदी त्यांचे काव्यसंग्रह प्रकाशित आहेत.त्यांच्या ग्रंथांतून कला व साहित्याविषयीचे तत्वज्ञान प्रकट होते.
लोककवी #वामनदादाकर्डक यांचा स्मृतिदिन.
'उद्धरली कोटी कुळे,भिमा तुझ्या जन्मामुळे' अश्या तेजस्वी गीतांतून डॉ #बाबासाहेबआंबेडकर यांच्या
विचारांची मशाल त्यांनी आपल्या ओजस्वी वाणीतून पेटती ठेवली व हे विचार महाराष्ट्राच्या घराघरांत-वाड्या वस्तीपर्यंत पोहोचविले.
आज #जागतिककुटुंबदिन.१९९३मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेने १५ मे हा दिवस 'आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन'म्हणून घोषित केला.१९९४ पासून हा दिवस साजरा करण्यात येतो.सामाजिक,आर्थिक,लोकसंख्याशास्त्रीय बदलांचा कुटुंबावर होणाऱ्या परिणामावर लक्ष केंद्रीत करणे हा या दिवसाचा उद्देश.



No comments:
Post a Comment