Wednesday, 10 June 2026

११ जून #दिनविशेष



अध्यापक,स्वातंत्र्यसैनिक,साहित्यिक,पत्रकार, समाजसेवक,लोकशाही समाजवादाचे भाष्यकार आणि आंतर-भारती चळवळीचे प्रवर्तक पांडुरंग सदाशिव साने तथा #सानेगुरुजी यांचा स्मृतिदिन.
१९३०-३२च्या सविनय कायदेभंग चळवळीतील सहभागामुळे धुळे,नाहीक व तिरुचिरापल्ली येथे त्यांना तुरुंगवास झाला.१९४६ मध्ये पंढरपूरचे विठ्ठलमंदिर अस्पृश्यांसाठी खुले व्हावे, म्हणून त्यांनी प्राणांतिक उपोषण केले आणि त्यांच्या मंदिरप्रवेशाचा मार्ग मोकळा करून दिला. विश्वभारतीच्या धर्तीवर ‘आंतर-भारती’ ही संस्था स्थापन करण्याचा संकल्प केला.१९४८ साली त्यांनी साधना हे साप्ताहिक पुण्यात सुरू केले .पुणे येथे १९४७ साली भरलेल्या बालकुमार साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यांनी कादंबरी, कथा, बालसाहित्य, कविता, निबंध, चरित्र इ. साहित्यप्रकारांत विपुल लेखन केले. त्यात बालांसाठी आणि कुमारांसाठी केलेले लेखन उल्लेखनीय आहे.

No comments:

Post a Comment