Friday, 29 March 2019

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी 12 सदिच्छादुतांचे आवाहन















निवडणूक विशेष वृत्त -


मुंबई, दि. 29 :  यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा, मतदान हक्काचे महत्व सांगण्यासाठी निवडणूक आयोगाच्यावतीने मतदार जागृतीचे विविध उपक्रम राबविले जात आहेत. मतदार जागृतीच्या या उपक्रमांना आता कला, क्रीडा, साहित्य आणि सामाजिक क्षेत्रातील विविध 12 मान्यवरांची ‘सदिच्छादूत’ म्हणून साथ लाभली आहे. समाज माध्यमे, मुद्रितमाध्यमे आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांबरोबरच जाहिरात फलक, भित्तीपत्रकादवारे हे सदिच्छादूत  लोकशाही सुदृढ करण्यासाठी मतदान करण्याचे आवाहन करीत आहेत.

या सदिच्छादूतांमध्ये पद्मभूषण आणि महाराष्ट्रभूषण सन्मानित अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर, ज्येष्ठ साहित्यिक पदमश्री मधु मंगेश कर्णिक, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, डॉ. निशिगंधा वाड, राष्ट्रीय पुरस्कार सन्मानित अभिनेत्री उषा जाधव, महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना, अर्जुन पुरस्कार सन्मानित महिला धावपटू ललिता बाबर, अर्जुन पुरस्कार सन्मानित जलतरणपटू वीरधवल खाडे, कॉमनवेल्थ गेम्समधील सुवर्णपदक विजेत्या नेमबाज राही सरनोबत, तृतीयपंथी कार्यकर्त्या गौरी सावंत, दिव्यांग कार्यकर्ता नीलेश सिंगीत यांचा समावेश आहे.
विशेष म्हणजे, 2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर, साहित्यिक मधु मंगेश कर्णिक, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, अभिनेते पद्माकर कांबळे, खेळाडू राही सरनोबत, वीरधवल खाडे, नेत्रशल्यचिकित्सक डॉ.तात्याराव लहाने, डॉ. प्रकाश आणि डॉ. मंदाकिनी आमटे, माजी सनदी अधिकारी ए.एम. खान यांनी ‘सदिच्छादूत’ म्हणून काम करुन मतदान जागृतीचे आवाहन केले होते. 
००००

Thursday, 28 March 2019

नागपूर लोकसभा मतदार संघात 30 उमेदवार निवडणूक रिंगणात



  3 उमेदवारी अर्ज मागे
नागपूर, दि. 28: लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 10-नागपूर मतदार संघात 30 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. 3 उमेदवारांनी आपले नामनिर्देशनपत्र मागे घेतले असून 6 उमेदवारी अर्ज अवैघ ठरले आहेत.
अ.क्र.
उमेदवारांचे नांव
पक्षांचे नाव
चिन्ह
1
नाना पटोले
इंडियन नॅशनल काँग्रेस
हात
2
नितीन जयराम गडकरी
भारतीय जनता पार्टी
कमळ
3
मोहम्मद जमाल  
बहुजन समाज पार्टी
हत्ती
4
अली अशफाक अहमद
बहुजन मुक्ती पार्टी
खाट
5
 आसीम अली 
मायनॉरीटीज डेमोक्रेटीक पार्टी
क्रेन
6
गोपालकुमार गणेशु कश्यप
छत्तीसगड स्वाभिमान मंच
काचेचा पेला
7
दिक्षीता आनंद टेंभूर्णे
देश जनहित पार्टी
ल्युडो
8
डॉ. मनीषा बांगर
पिपल्स पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटीक)
फळा
9
मनोहर उर्फ सागर पुंडलीकराव डबरासे
वंचित बहुजन आघाडी
कपबशी
10
ॲड (डॉ) माने सुरेश 
बहुजन रिपब्लीकन सोशालिस्ट पार्टी
एअरकंडिशनर
11
कॉम्रेड योगेश कृष्णराव ठाकरे
कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (एम.एल.) रेड स्टार
करवत
12
वनिता जितेंद्र राऊत
अखिल भारतीय मानवता पक्ष
पेनाची नीब सात किरणांसह
13
ॲड.  विजया दिलीप बागडे
आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया
कोट
14
विठ्ठल नानाजी गायकवाड
हम भारतीय पार्टी
ऊस शेतकरी
15
डॉ.विनोद काशिराम बडोले
अखिल भारतीय सर्वधर्म समाज पार्टी
बॅट
16
साहिल बालचंद तुरकर
भारतीय मानवाधिकार फेडरल पार्टी
बिस्कीट
17
श्रीधर नारायण साळवे
राष्ट्रीय जनसंभावना पार्टी
फुलकोबी
18
उदय रामभाऊजी बोरकर
अपक्ष
पेन स्टँड
19
ॲड. उल्हास शालिकराम दुपारे
अपक्ष
कपाट
20
कार्तिक गेंदलाल डोके
अपक्ष
तुतारी
21
दिपक लक्ष्मणराव मस्के
अपक्ष
हेलीकॉप्टर
22
प्रफुल्ल माणिकचंद भांगे
अपक्ष
हेल्मेट
23
प्रभाकर कृष्णाजी सातपैसे
अपक्ष
पाण्याची टाकी
24
मनोज कोठुजी बावणे
अपक्ष
फुटबॉल
25
रुबेन डॉमनीक फ्रांसीस
अपक्ष
ट्रॅक्टर चालवणारा शेतकरी
26
सचिन जागोराव पाटील
अपक्ष
सीसीटीव्ही कॅमेरा
27
सचिन हरीदास सोमकुंवर
अपक्ष
संगणक
28
सतिश विठ्ठल निखार
अपक्ष
रबर स्टॅम्प
29
सिद्धार्थ आसाराम कुर्वे
अपक्ष
लॅपटॉप
30
सुनिल सुर्यभान कवाडे
अपक्ष
रोड रोलर
*******