Saturday, 9 May 2026
Schedule 8th to 11th May
#SomnathVirasatke75Saal. Somnath is a symbol of India's indomitable civilisation. Today, under the leadership of Prime Minister Shri Narendra Modi, this sacred land proudly heralds India's cultural renaissance.
#सोमनाथ वारसा ७५ वर्षांचा
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ही पवित्र भूमी भारताच्या सांस्कृतिक पुनर्जागरणाची अभिमानाने घोषणा करत आहे.
या सुवर्णक्षणाचे साक्षीदार बना…
🗓️ दि. ८ ते ११ मे २०२६
📍 श्री सोमनाथ मंदिर संकुल, प्रभास पाटण
Friday, 8 May 2026
८ मे #दिनविशेष
आज #जगतिकरेडक्रॉसदिन.या संस्थेचे संस्थापक हेन्नी ड्युनान्ट यांच्या जन्मदिनाची आठवण म्हणून #रेडक्रॉस दिन साजरा होतो. १८ ऑगस्ट १८६३ रोजी हेन्नी यांनी रेडक्रॉस संस्थेचा पाया घातला.या संस्थेद्वारे जगभर करण्यात येणाऱ्या मानवतावादी कार्याचा सन्मान या दिवशी होतो.
मुक्तछंद काव्यप्रकाराचे प्रवर्तक आत्माराम रावजी देशपांडे तथा #कवीअनिल यांचा स्मृतीदिन.दशपदी हा १० चरणांचा काव्यप्रकार त्यांनी मराठी काव्य प्रांतात रुजवला.'फुलवात' हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह.१९५८च्या मालवण साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
तीन वर्षाच्या बालकाला मिळाले जीवदान-मुख्यमंत्री सहायता निधीतून ३ लाख रुपयांची मदत
नागपूर, ७ मे : रक्त कर्करोगग्रस्त एका तीन वर्षाच्या बालकाला मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून आर्थिक साह्य मिळाल्याने त्याच्यावर वेळीच उपचार होऊन जीवदान मिळाले आहे.
नागपूरच्या सावित्रीबाई फुले नगर, पार्वती नगरातील रहिवासी असलेल्या विवेक किरण देशमुख या तीन वर्षाच्या बालकाला रक्त कर्करोगाचे निदान झाले आणि त्याच्या माता- पित्याच्या पायाखालची जमीनच सरकली. हातमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या या पालकांना मुलाच्या उपचाराचा खर्च कसा करायचा, असा प्रश्न पडला होता. त्याला होणाऱ्या वेदनांनी त्यांचे हृदय पिळवटून निघत होते. मुलाचा जीव वाचविण्यासाठी तातडीने केमोथेरपी व इतर आवश्यक उपचार करणे गरजेचे होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या बालकाबाबत कळताच त्यांनी दिलेल्या निर्देशानुसार मुख्यमंत्री वैद्यकीय सहयता निधी अंतर्गत मुलाच्या उपचारासाठी ५० हजार रुपये व अतिरिक्त खर्च म्हणून २ लाख ५० हजार रुपये असे एकूण ३ लाख रुपये आर्थिक मदत तातडीने मंजूर करण्यात आली. या मदतीमुळे व्होकहार्ट रुग्णालयात वेळीच केमोथेरपी आणि अन्य उपचार करण्यात आले. आता या मुलाच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. त्याच्या चेहऱ्यावर पुन्हा उमललेले हास्य आमच्यासाठी जगण्याची नवीन उमेद घेऊन आल्याची भावना त्याच्या पालकांनी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कार्यालयाची कायर्पद्धती अत्यंत जलद, संवेदनशील व माणुसकी जपणारी असल्याचा अनुभव आम्हाला आल्याचे त्याच्या पालकांनी सांगितले. या मदतीबद्दल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक, नागपूर कक्ष प्रमुख डॉ. सागर पांडे यांचे आभार मानले आहेत.
00000
Subscribe to:
Posts (Atom)




