Thursday, 28 March 2019

रामटेक लोकसभा मतदार संघात 16 उमेदवार निवडणूक रिंगणात



5 उमेदवारी अर्ज मागे
नागपूर, दि. 28: लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 09-रामटेक (अ.जा.) मतदार संघात 16 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. 5 उमेदवारांनी आपले नामनिर्देशनपत्र मागे घेतले असून 3 उमेदवारी अर्ज अवैघ ठरले आहेत.
अ.क्र.
उमेदवारांचे नांव
पक्षांचे नाव
चिन्ह
1
किशोर उत्तमराव गजभिये
इंडियन नॅशनल काँग्रेस
हात
2
कृपाल बाळाजी तुमाने
शिवसेना
धनुष्यबाण
3
सुभाष धर्मदास गजभिये
बहुजन समाज पार्टी
हत्ती
4
अर्चना चंद्रकुमार उके
राष्ट्रीय जनसंभावना पार्टी
फुलकोबी
5
किरण प्रेमकुमार रोडगे (पाटणकर)
वंचित बहुजन आघाडी
कपबशी
6
चंद्रभान बळीराम रामटेके
राष्ट्रीय जनसुराज्य पार्टी
पाटी
7
कॉम्रेड बंडू रामचंद्र मेश्राम
कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्कसीस्ट-लेनिनिस्ट) रेडस्टार
करवत
8
डॉ.एल.जे. कान्हेकर
पिपल्स पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटीक)
फळा
9
धिमान विनोद भिवाजी पाटिल
आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया
कोट
10
शैलेष संभाजी जनबंधू
सोशालिस्ट युनिटी सेंटर ऑफ इंडिया (कम्युनिस्ट)
बॅटरी टॉर्च
11
अनील महादेव ढोणे
अपक्ष
हेलीकॉप्टर
12
तुमाने कांतेश्वर खुशालजी
अपक्ष
बॅट
13
गौतम वासनीक
अपक्ष
कपाट
14
प्रोफेसर डॉ.नत्थूराव माधवराव लोखंडे
अपक्ष
ऑटो-रिक्षा
15
सोनाली रविंद्र बागडे
अपक्ष
चावी
16
सन्देश भिवराव भालेकर
अपक्ष
खाट

*******

दिनेश कुमार यादव केंद्रीय पोलिस निवडणूक निरीक्षक


रवीभवन येथे मतदारांसाठी उपलब्ध
नागपूर, दि.26 :  निवडणूक आयोगाने  भारतीय पोलिस सेवेचे वरिष्ठ अधिकारी दिनेश कुमार यादव यांची रामटेक व वर्धा लोकसभा मतदार संघासाठी केंद्रीय पोलिस निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. श्री. दिनेश कुमार यादव हे आय.पी.एस. 1998 या बॅचचे अधिकारी आहेत.
रामटेक लोकसभा मतदार संघात मुक्त वातावरणात निवडणुका घेण्याच्यादृष्टीने मतदारांसाठी रविभवन कॉटेज क्रमांक 3 येथे सकाळी 10 ते 11 या कालावधीत उपलब्ध राहणार आहेत. त्यांचा दूरध्वनी क्रमांक 9022223697, 9635005262 असा आहे. 
******

विनोद कुमार केंद्रीय निवडणूक खर्च निरीक्षक

रवीभवन येथे मतदारांसाठी उपलब्ध
नागपूर, दि.26 :  निवडणूक आयोगाने  भारतीय रेव्हेन्यू सेवेचे वरिष्ठ अधिकारी विनोद कुमार यांची नागपूर लोकसभा मतदार संघासाठी केंद्रीय निवडणूक निरीक्षक (खर्च) म्हणून नियुक्ती केली आहे. श्री. विनोद कुमार हे आर.आय.एस. 2005 या बॅचचे अधिकारी आहेत.
नागपूर लोकसभा मतदार संघात मुक्त वातावरणात निवडणुका घेण्याच्यादृष्टीने मतदारांसाठी रविभवन कॉटेज क्रमांक सी-7 येथे सकाळी 11 ते 1 या कालावधीत उपलब्ध राहणार आहेत. त्यांचा दूरध्वनी क्रमांक 09969235099 हा आहे. व रविभवन कॉटेज येथील दूरध्वनी क्रमांक 0712-2522863 असा आहे.
******

प्रसन्ना कुमार जेना रामटेकसाठी केंद्रीय निवडणूक निरीक्षक



रवीभवन येथे मतदारांसाठी उपलब्ध
नागपूर, दि.26 :  निवडणूक आयोगाने ओडिशा कॅडरच्या वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी प्रसन्ना कुमार जेना यांची रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी केंद्रीय निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.  प्रसन्ना कुमार जेना हे ओडिशा कॅडरच्या 2005 बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.
रामटेक लोकसभा मतदारसंघात मुक्त वातावरणात निवडणुका घेण्याच्यादृष्टीने मतदारांसाठी त्या रवीभवन येथे उपलब्ध राहणार आहेत. लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूकसंदर्भात त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आढावा घेतला. निवडणूक निरीक्षक प्रसन्ना कुमार जेना यांचा मुक्काम रवीभवन कॉटेज क्रमांक 9 येथे असून त्यांचा भ्रमण ध्वनीक्रमांक 9022207090 असा आहे.  सर्व मतदारांना त्या सकाळी 11 ते 1 या वेळेत रवीभवन येथे उपलब्ध आहेत. 
******