नागपूर, दि.30 : राज्य उत्पादन विभागाच्या धडक कारवाईत देशी दारुच्या 25 पेट्यासह दोन कार असा एकूण 10 लाख 87 हजार रुपय किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या माहिती नुसार वरोरा तालुक्यातील वनोजा येथे ही कारवाई यशस्वीपणे करण्यात आली.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक डॉ. बी. एच. तळवी यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सुनील गुजर यांनी एमएच 29 एआर 2814 व एमएच 04 एचएन 3349 या दोन्ही वाहनामधून देशी दारुच्या एकूण 25 पेट्या म्हणजेच 2500 बॉटल जप्त केल्या आहेत. या कारवाई मध्ये योगेश रामास्वामी सोदारी व विक्रम शिवकुमार भगत राहणार लोहारा (यवतमाळ) यांना अटक करण्यात आली. एक आरोपी प्रणित मालखेडे हा फरार झाला आहे. ही कारवाई उत्पादन शुल्क निरीक्षक सुनील गुजर, सहायक दुय्यम निरीक्षक डी.एन. आवारी, चेतन अवचट, व जगदीश कापटे यांनी यशस्वीपणे पूर्ण केली.
0000000

No comments:
Post a Comment