Friday, 31 March 2017

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना अर्ज करण्यासाठी 31 मार्चपर्यंत मुदतवाढ

नागपूर, दि.27 :   अनुसूचित जाती व नवबौध्द विद्यार्थ्यांची संख्येत होणारी वाढ लक्षात घेवून सगळयाच विद्यार्थ्यांना वस्तीगृहाची सुविधा उपलब्ध होत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागते. वस्तीगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना लाभ मिळावा या हेतूने शासनाने 10 वी नंतरच्या अभ्यासक्रमांना व 12 वी नंतरच्या व्यवसायीक तसेच बिगर व्यवसायीक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश मिळालेल्या परंतु शासकीय वस्तीगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द विद्यार्थ्यांना भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा या विद्यार्थ्यांना स्वत: उपलब्ध करुन घेण्यासाठी आवश्यक रक्कम संबंधित विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट वितरीत करण्यासाठी शासनाने भारतरत्न डॉ. बाबासाहेत आंबेडकर स्वाधार योजना सुरु केली आहे.
या योजनेसाठी विद्यार्थी जेथे शिक्षण घेत आहे तेथील स्थानिक नसावा व त्यांच्या पालकांचे उत्पन्न 2.50 लाखापेक्षा जास्त नवासे. 10 वी, 12 वी, पदवी, पदविका परिक्षेमध्ये 60 टक्क्यापेक्षा जास्त गुण असणे अनिवार्य आहे. अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ही मर्यादा 50 टक्के आहे. या योजनेसाठी 23 मार्चपर्यंत अर्ज सादर करावयाचे होते. पण आता या योजनेत अर्ज सादर करण्यासाठी 31 मार्च 2017 पर्यंत मुदतवाढ करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त माधव झोड यांनी केले आहे.
0000000

No comments:

Post a Comment