जिल्हाधिकारी कार्यालयाची धडक कारवाई
नागपूर, दि 18 : ॲन्टी मायनिंगला आळा बसविण्याकरिता सुरु असलेल्या मोहिमेमध्ये अवैध उत्खनन व वाहतूक केल्याबद्दल 61 प्रकरणात 8 लक्ष 44 हजार 400 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी आज येथे केली.
अवैधपणे रेतीचे उत्खनन व वाहतूक तसेच दगड आदी मायनिंग संदर्भात आज प्रशासनातर्फे केलेल्या कारवाईमध्ये सर्वाधिक आठ प्रकरणे सावनेर तहसीलमध्ये नोंदविण्यात आले असून 94 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे. भिवापूर तालुक्यात तीन प्रकरणात 1 लाख 2 हजार, पारशिवनीत 1 लाख 43 हजार 700, उमरेड 1 लाख 67 हजार 600 तसेच इतर जिल्ह्यातही 61 प्रकरणांमध्ये 8 लक्ष 44 हजार 400 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे. अवैधपणे रेती व दगड वाहतूक करणाऱ्या विरुद्ध प्रभावीपणे मोहीम राबविण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी सांगितले.
जिल्ह्यात 1 हजार 118 प्रकरणात कारवाई
अवैधपणे उत्खनन व वाहतूक करणाऱ्याविरुद्ध 1 एप्रिलपासून 1 हजार 118 प्रकरणात 4 कोटी 69 लक्ष 20 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे. ही संपूर्ण रक्कम शासन जमा करण्यात येवून 134 गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी दिली
****

No comments:
Post a Comment