Saturday, 18 March 2017

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या लाभाकरिता अर्ज आमंत्रित

नागपूर, दि 18 :  अकरावी, बारावी आणि त्यापुढील व्यवसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, ज्या विद्यार्थ्यांना  त्या ठिकाणी प्रवेश मिळणार नाही अशा विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी 23 मार्च 2017 पर्यंत अर्ज सादर करावेत.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी जेथे शिक्षण घेत आहे तेथील स्थानिक नसावा, विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाखापेक्षा जास्त नसावे, इयत्ता दहावी, बारावी , पदवी, पदविका परीक्षेमध्ये 60 टक्केपेक्षा जास्त गुण अनिवार्य आहे. अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी गुणांची मर्यादा 50 टक्के आहे. विद्यार्थ्यांनी अर्जासोबत जातीचे प्रमाणपत्र 23 मार्च 2017 पर्यंत https://mahaeschol.maharashtra.gov.in, https://sjsa.maharashtra.gov.in , https://www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर पाठविण्याचे आवाहन प्रादेशिक उपायुक्त माधव झोड यांनी केले आहे.

                                                              ****

No comments:

Post a Comment