Thursday, 16 March 2017

आयुष्यात शिस्तप्रियता महत्वाची -के.एन.के. राव

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न
         नागपूर, दि. 15 :  जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रत्येकाला आपल्या आवडीच्या क्षेत्रात करीअर निवडीचे स्वातंत्र्य मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी पालकांनी आपल्या पाल्यांच्या आवडी-निवडी लक्षात  घेतल्या पाहिजेत. तसेच मुलांच्या कलागुणांना वाव द्यावा व त्यांना त्यांचे करिअर घडविण्यासाठी प्रोत्साहन द्यावे, असे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी के.एन.के.राव यांनी केले.
             जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून लक्ष्मीनगर येथील सायंटिफिक सभागृहात आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी  ते बोलत होते. यावेळी मेजर जनरल चंदन चॅटर्जी , ब्रिगेडियर सुनिल गावपांडे, कँप्टन दिपक लिमसे, यांची प्रमुख उपस्थिती होती.
            यावेळी माजी सैनिकांच्या पाल्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. तत्पूर्वी मेजर चंदन चॅटर्जी यांच्या हस्ते दिपाली नासरे व अक्षय धुरंधर यांना दिवगंत मेजर एस.आर.पेंढारकर विशेष गौरव पुरस्कार देण्यात आला. तसेच दिवंगत एम.जी. तामस्कर विशेष गौरव पुरस्कार शितल सुद या विद्यार्थिनीला कॅप्टन दिपक लिमसे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
          तत्पूर्वी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. सूत्र संचालन रुबी सिंग व प्रांजली केसरकर यांनी तर आभार प्रदर्शन सहायक जिल्हा सैनिक अधिकारी रमेश वांढरे यांनी केले. यावेळी माजी सैनिक, त्यांच्या पत्नी व पाल्यांची मोठया प्रमाणात उपस्थिती होती.

*****

No comments:

Post a Comment