Thursday, 16 March 2017

सामाजिक न्याय विभागाची मिनी ट्रॅक्टर पुरवठा योजना

नागपूर, दि. 15 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने पुरवठा करण्यात येणार आहे. या योजनेमध्ये 9 ते 18 अश्वशक्तीचे मिनी ट्रॅक्टर, 1.5 टन भार क्षमतेचे नॉन टीपींग ट्रेलर व 0.5 मी रोटावेटर या साहित्याचा समावेश आहे.
सन 2016-17 यावर्षाकरिता सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी योजनेच्या अटी व शर्ती पूर्ण करणाऱ्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांनी संबंधित जिल्ह्यांचे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त यांचेकडे 8 दिवसात अर्ज सादर करावे, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त माधव झोड यांनी एका परिपत्रकाद्वारे केले आहे.
सदर योजनेमध्ये पात्र लाभार्थी गटाला 90 टक्के शासकीय अनुदान मिळणार असून 10 टक्के हिस्सा लाभार्थी गटाला धनाकर्षाद्वारे घ्यावा लागेल. तसेच लाभार्थी बचत गटाची निवड केल्यानंतर 9 ते 18 अश्वशक्तीचा मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांची खरेदी करावी लागेल. परंतु जे बचत गट सदर किमान मर्यादेपेक्षा अधिक अश्वशक्तीचा  मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधनांची खरेदी करु इच्छित असतील अशा लाभार्थी बचत गटांना अनुज्ञेय रकमेच्या पुढील रक्कम स्वत: भरावी लागेल, असे त्यांनी सूचित कले आहे.

****

No comments:

Post a Comment