नागपूर, दि. 13 : डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या विशेष पर्वावर निती आयोगाच्या वतीने पंतप्रधान घरकुल योजनेच्या भूमीपूजनासाठी प्रधान मंत्री नरेंद्र मोदी उद्या, दिनांक 14 एप्रिल 2017 रोजी नागपूर येथील विभागीय क्रीडा संकुल, मानकापूर येथे दुपारी 1.10 वाजता उपस्थित राहणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. तसेच केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय माहिती, तंत्रज्ञान आणि विधी व न्याय मंत्री रवी शंकर प्रसाद, केंद्रीय मानव संसाधन मंत्री प्रकाश जावडेकर, केंद्रीय ऊर्जा, कोळसा, अपारंपरिक ऊर्जा राज्यमंत्री पीयुष गोयल, केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांची या विशेष कार्यक्रमास उपस्थिती राहणार आहेत.
निती आयोगातर्फे रोख विरहित अर्थ व्यवस्थेला चालना देण्यासाठी विभागीय क्रीडा संकुल, मानकापूर येथे 100 वा जनधन (डिजीधन) मेळावा घेण्यात येत आहे. यावेळी “भीम” कॅश बॅक आणि रेफरल स्कीम तसेच भीम आधार यासोबतच डिजीधन व्यापार योजना आणि मेगा ड्रा अंतर्गत निवडण्यात आलेल्या स्पर्धकांना बक्षिस वितरण करण्यात येणार आहे. प्रधान मंत्री आवास योजना एआयआयएमएस(AIIMS), आयआयएम(IIM) व आयआयआयटी (IIIT)नागपूर या संस्थांच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम यावेळी होणार आहे.
*****
No comments:
Post a Comment