नागपूर दि. 13 :- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह अंतर्गत महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या. जिल्हा कार्यालय, नागपूर येथे नुकतेच महामंडळामार्फत व्यवसायाकरिता अनुदान योजना व बीजभांडवल योजनेअंतर्गत बँकेमार्फत कर्ज मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना धनादेश वितरित करण्यात आले.
यावेळी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुष्पहार घालून दीप प्रज्वलित करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रादेशिक व्यवस्थापक, प्रशांत गेडाम होते. जिल्हा व्यवस्थापक सिध्दार्थ खोब्रागडे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. यावेळी महामंडळाच्या योजनाबाबत माहिती देवून लाभार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. कर्ज मिळाल्यानंतर योग्य प्रकारे व्यवसाय करुन प्रगती करावी, बँक आणि महामंडळाच्या योजनांचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा, असे आवाहन यावेळी उपस्थितांना करण्यात आले. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते लाभार्थ्यांना बिजभांडवल योजने अंतर्गत अनुदान बिजभांडवल 1,13,000 रुपयांचे धनादेश वितरीत करण्यात आले.
यावेळी प्रादेशिक व्यवस्थापक वसंतराव नाईक वि.जा.भ.ज. विकास महामंडळ नागपूर, जिल्हा व्यवस्थापक संत रोहिदास चर्मकार विकास महामंडळ, जिल्हा व्यवस्थापक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, जिल्हा कार्यालय नागपूर तसेच महामंडळाचे कर्मचारी उपस्थित होते.
*****
No comments:
Post a Comment