न्यायमूर्ती नितीन सामरे यांच्या उपस्थितीत विशेषांकाचे लोकार्पण
नागपूर, दि. 11 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रकाशित करण्यात आलेल्या क्रांतिसूर्य हा विशेषांक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजकारण, समाजकारण, अर्थकारण तसेच कामगार या क्षेत्रातील त्यांनी केलेल्या अजोड कामगिरीविषयी असलेल्या अभ्यासपूर्ण माहितीमुळे हा अंक सर्वांगसुंदर व संग्राह्य झाला आहे, अशी प्रतिक्रिया उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे वरीष्ठ न्यायमूर्ती भूषण गवई यांनी दिली
लोकराज्यच्या क्रांतिसूर्य या विशेषांकाचे लोकार्पण वरीष्ठ न्यायमूर्ती भूषण गवई तसेच न्यायमूर्ती नितीन सांबरे यांच्या हस्ते लोकार्पण झाले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार राहुल पांडे, ॲड. उदय डबले, माहिती संचालक राधाकृष्ण मुळी, जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर उपस्थित होते.
माहिती व जनसंपक महासंचालनालयातर्फे लोकराज्य हे मासिक नियमित तसेच दर्जेदार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करतांना वरीष्ठ न्यायमूर्ती भूषण गवई म्हणाले की लोकराज्यच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, सामाजिक तसेच पर्यटना संदर्भातील अभ्यासपूर्ण माहिती एकत्रपणे अभ्यासक व वाचकांना उपलब्ध होत असल्यामुळे संपूर्ण माहिती एकत्रितपणे वाचनीय व संग्रही ठेवणे सुलभ आहे. शासनाच्या विविध योजना तसेच अंमलबजावणी संदर्भातील माहितीसुद्धा या अंकामुळे अभ्यासकांना उपलब्ध होत असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख त्यांनी केला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त स्त्रीमुक्तीचा उद्गाता तसेच स्वयंप्रकाशित होण्याची प्रेरणा आदी विषयाचे लेख अभ्यासपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले.
न्यायमूर्ती नितीन सांबरे यांनी लोकराज्य हे मासिक माहितीपूर्ण
******

No comments:
Post a Comment