मुंबई,दि. 6 : अन्न व औषध प्रशासन कायद्याच्या नियमांचे उल्लंघन करुन बनावट सौंदर्य प्रसाधने व औषधे निर्माण करणा-या कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे. या संदर्भातील कायदा केंद्र शासनाचा असून त्यात आमुलाग्र बदल आवश्यक आहे. त्यासाठी केंद्र व राज्य शासनाने आवश्यक ती पावले उचलली असून या संदर्भातील गुन्हा अजामीनपात्र होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे अन्न व प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी आज विधानसभेत सांगितले.
सदस्य योगेश सागर यांनी ठाणे आणि भिवंडी येथे अन्न व औषध प्रशासनाने औषधांचा साठा जप्त केल्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता, त्याला उत्तर देताना श्री. बापट बोलत होते. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री राजेंद्र पाटणी, हरीष पिंपळे यांनी भाग घेतला.
000
No comments:
Post a Comment