Friday, 7 April 2017

शिवछत्रपती क्रीडापीठाला स्वायत्तता देण्याचा निर्णय - क्रीडा मंत्री विनोद तावडे

मुंबई,दि. 6 : म्हाळुंगे-बालेवाडी येथे शिवछत्रपती क्रीडापीठाला यशदा व पोलीस अकादमीच्या धर्तीवर जून 2017 पर्यंत स्वायत्तता देण्यात येइल, अशी माहिती क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी आज विधानसभेत दिली.
            सदस्या मेधा कुलकर्णी यांनी या संदर्भात प्रश्न विचारला होता, त्याला उत्तर देताना श्री. तावडे म्हणाले की, या क्रीडा विभागासाठी सनदी लेखापालाची नियुक्ती केली असून दरवर्षी जमाखर्चाची तपासणी केली जाते. क्रीडा क्षेत्र व क्रीडापटुंना न्याय देण्यासाठी या क्रीडापीठाला स्वायत्तता देण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. विवाह सोहळ्यांसाठी क्रीडा संकुलाची जागा देण्यात येणार नाही हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याचे श्री.तावडे यांनी सांगितले.
या क्रीडापीठामध्ये वर्षानुवर्ष एकाच पदावर कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली असून ते बदलीच्या जागी हजर न झाल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असेही श्री.तावडे यांनी सांगितले.
            यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री योगेश सागर, प्रकाश आबिटकर यांनी भाग घेतला.
000

No comments:

Post a Comment