Thursday, 6 April 2017

केंद्रीय ऑग्रनिक फार्ममिंग रिजनल सेंटरला केंद्रीय सहसचिवांची भेट



नागपूर, दि.05 :    केंद्रीय ऑग्रनिक फार्ममिंगच्या विभागीय केंद्रास केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण विभागाच्या सहसचिव श्रीमती आय. राणीकुमुद्दिनी यांनी भेट देवून ऑग्रिनिक शेती संदर्भात सुरु असलेल्या विविध उपक्रमाचे माहिती घेतली. महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश आदी राज्यातील शेतकरी तसेच अभ्यासक ऑग्रनिक शेतीसंदर्भत या केंद्रामार्फत प्रशिक्षण दिले जाते.
अमरावती महामार्गावरील गोंडखैरी येथे केंद्र शासनाने ऑग्रनिक शेती विकासासंदर्भात अद्यावत प्रयोगशाळा, तसेच प्रशिक्षणसाठी विभागीय केंद्र सुरु केले आहे. ऑग्रनिक शेती उत्पादनाचे प्रोत्साहन देण्यासाठी राज्यातील ही महत्वाची संस्था असून महाराष्ट्रामध्ये ऑग्रनिक शेती उत्पादनाला मोठ्या प्रमाणात सुरुवात होत असल्याचे केंद्र सहसचिव श्रीमती आय. राणीकुमुद्दिनी यांनी सांगितले.
ऑग्रनिक फार्ममिंग केंद्राचे विभागीय संचालक डॉ. ए. एस. राजपूत यांनी स्वागत करुन विभागीय केंद्रामार्फत सुरु असलेल्या विविध उपक्रमांचे माहिती देण्यात आली. केंद्र शासनातर्फे ऑग्रनिक फार्ममिंग शेतीसंदर्भात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांमध्ये जागृती निर्माण करण्यात आली. सहसचिव श्रीमती राणीकुमुद्दिनी यांनी अकोला येथे ऑग्रनिक शेती संदर्भात गाव नामफलकाचे उद्घाटन केले. तसेच बुलढाणा जिल्हयातील मंगळूर येथे शेतकऱ्यांसोबत ऑग्रनिक शेती उत्पादनासंदर्भात चर्चा केली. यावेळी निम फाऊंडेशनचे संचालक श्री पदोळे उपस्थित होते.
00000000

No comments:

Post a Comment