Friday, 7 April 2017

धान साठवणूकीसाठी आदिवासी भागात सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावरील (पीपीपी) गोदामे बांधणार - रविंद्र चव्हाण

मुंबई,दि. 6 : राज्यातील आदिवासी भागात धान साठवणूकीसाठी सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावरील (पीपीपी) गोदामे बांधण्यात येतील, असे अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज विधानसभेत सांगितले.
            सदस्य सरदार तारासिंह यांनी साकोली जि.भंडारा तसेच विदर्भातील अनेक जिल्ह्यात हमी भाव धान खरेदी केंद्रा अंतर्गत खरेदी केलेले धान मिल मालक उचलत नसल्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता त्याला उत्तर देताना राज्यमंत्री चव्हाण बोलत होते.
याबाबत माहिती देताना श्री.चव्हाण म्हणाले की, हंगाम 2016-17 मध्ये भंडारा जिल्ह्यात खरेदी करण्यात आलेल्या धानाच्या भरडाईसाठी 63 मिलर्सची नेमणूक करण्यात आली आहे. विदर्भातील अन्य जिल्ह्यातही 59 राईल मिलर्सबरोबर करारनामे करण्यात आले असून भरडाईचे काम सुरु आहे. धान साठविण्यासाठी आदीवासी भागात सार्वजनीक खाजगी भागीदारी तत्वावर गोदामे बांधण्यात येतील, असेही श्री.चव्हाण यांनी सांगितले.
            यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री डॉ.जयप्रकाश मुंदडा, चरण वाघमारे यांनी भाग घेतला.
000

No comments:

Post a Comment