मुंबई, दि. 6 : अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालय व राज्य विधीमंडळ राष्ट्रीय परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आंतरराष्ट्रीय पातळीवर राष्ट्राराष्ट्रांतील देवाण घेवाण’ या कार्यक्रमांतर्गत अमेरिकेचे दोन स्टेट सेनेटर श्रीमती पामेला अल्थॉफ व राज मुखर्जी यांनी शिष्टमंडळासह आज विधानभवनाला भेट दिली. यावेळी त्यांनी विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची सदिच्छा भेट घेतली.
जगभरात विविध देशांत निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींमध्ये लोकशाही शासनव्यवस्था व संसदीय कार्यप्रणाली बळकट करुन अजून परिणामकारकपणे अंमलबजावणी करण्यासाठी, तसेच त्यामध्ये अचूकता आणणे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. याविषयी यावेळी चर्चा करण्यात आली.
अमेरिकेच्या शिष्टमंडळाने विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दोन्ही सभागृहाच्या कामकाजाचे अवलोकन केले.
यावेळी परिवहन मंत्री दिवाकर रावते, विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार संजय दत्त, प्रकाश गजभिये, विधानमंडळाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे, मुंबईच्या युएस कौन्सिल जनरलचे सांस्कृतिक व्यवहार अधिकारी जेम्स फेनेल, वरिष्ठ सांस्कृतिक व्यवहार सल्लागार तस्नीम काळसेकर, राजकीय अधिकारी क्रिस्टन स्वार्झकोफ आदी उपस्थित होते.
०००००

No comments:
Post a Comment