मुंबई,दि. 6 : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळांच्या राज्यातील सात क्षेत्रांत सामूहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र कंपन्यांना चालविण्यासाठी देण्यात आले असून भविष्यात औद्योगिक प्रदुषणाच्या तक्रारी आल्यास या संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी आज विधानसभेत सांगितले.
सदस्य डॉ.मिलिंद माने यांनी बुटीबोरी येथील इंडोरामा पॉवर प्लान्ट व शिल्पा रोलिंग मिलमुळे होणाऱ्या प्रदुषणाबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता त्याला उत्तर देताना श्री. कदम बोलत होते. या कंपन्यांद्वारे प्रक्रिया केंद्र सुरु नसेल तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असेही श्री.कदम यांनी यावेळी सांगितले.
यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री जयप्रकाश मुंदडा, सुनील देशमुख यांनी भाग घेतला.
000
No comments:
Post a Comment