मुंबई, दि. 28 : बुलढाणा जिल्ह्यातील 4 पाणीपुरवठा योजनांच्या नुतनीकरणासाठी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश बुलढाणा जिल्हा परिषदेला पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री श्री. बबनराव लोणीकर यांनी आज दिले.
मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर व मोताळा तालुक्यातील 4 प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांचे नुतनीकरणा संदर्भात मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला आमदार चैनसुख संचेती यांच्यासह पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना पाणीपुरवठा मंत्री श्री लोणीकर म्हणाले, मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यातील दुधलगावसह २२ गावांसाठी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना, मोताळा तालुक्यातील दाताळासह १५ गावात प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजना, मोरखेड १० गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना, मलकापूर तालुक्यातील पान्हेरासह ४ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना आणि पान्हेरासह ५ गावें प्रादेशिक पाणीपुरवठा योजना या योजनासाठी बुलढाणा जिल्हा परिषदेने दुरुस्तीसाठी आणि विस्तारित अशा प्रकारे दोन स्वतंत्र प्रस्ताव पाठवावेत. या प्रस्तावांचा विशेष बाब म्हणून पाठपुरावा मुख्यमंत्री आणि वित्त मंत्री यांच्या कडे करू, असे आश्वासनही त्यांनी शेवटी दिले.
००००

No comments:
Post a Comment