Friday, 28 July 2017

विधानसभा प्रश्नोत्तरे :हृदय शस्त्रक्रियेसंदर्भातील सामुग्रीची किंमत निश्चित करणारे देशात महाराष्ट्र हे पहिले राज्य - गिरीश बापट

मुंबईदि 28 : अन्न व औषध प्रशासनाने मोठ्या रुग्णालयांवर कारवाई सुरू केली आहे. इन्ट्राॲक्युलर लेन्सऑक्युपेडिक इम्प्लायन्सेंस,कॅथेटर या सारख्या 12 वैद्यकिय उपकरणांची औषधीय संज्ञेत आणि अत्यावश्यक औषधांच्या राष्ट्रीय यादीत (National list of Essential Medicine) समावेश करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरणार आहे. या संदर्भातील केंद्राचा कायदा 1 जानेवारी 2018 पासून राज्यात अमलात येणार आहे. या कायद्यामुळे कोणत्याही रुग्णालयात गरीब आणि सामान्य रुग्णांची फसवणूक टळणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी आज विधानसभेत दिली.
            विधानसभेत राज्यात हृदयरोग शस्त्रक्रियेसाठी वापरल्या जाणाऱ्या सामुग्रीचा पुनर्वापर तसेच मोतीबिंदूसाठी लेन्सची जास्त किंमत आकारण्यासंदर्भात प्रश्नोत्तराच्या तासात सदस्य भिमराव तापकीर यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना श्री. बापट बोलत होते.
मंत्री श्री. बापट म्हणाले कीहृदय शस्त्रक्रिया आणि लेन्स यासंदर्भातील 12 वैद्यकिय  उपकरणे हे या नियमात येणार आहेत. कायद्यानुसार त्यांची किंमत निश्चीत करण्यात येणार आहे. मोठ्या रुग्णालयांत या उपकरणांचा पुनर्वापर होत असल्याचे आढळले असून अन्न,औषध प्रशासन विभागाने अशा मोठ्या आठ रुग्णालयांवर कारवाई केली आहे. ड्रग्स अँड कॉस्मेटीक ॲक्ट अंतर्गत फोर्टीसहिरानंदानी अशा 7 रूग्णालयावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याचबरोबरसंबंधीत औषधांची किंमत राष्ट्रीय यादीत समाविष्ट झाल्यावर रुग्णालयाच्या बाहेर त्याचे फलक लावण्यात येणार आहे.  रुग्णालयात किती शस्त्रक्रिया झाल्याउपकरणांचा किती वापर झाला,किती खरेदी झाली यासंदर्भात माहिती देणारे पोर्टलही तयार करण्यात येईल,अशी माहितीही श्री. बापट यांनी दिली.
            राज्यमंत्री मदन येरावार यावेळी म्हणाले, आरोग्य सेवा संचालनालय आणि वैद्यकिय शिक्षण संचालक यांच्याकडून शासकीय रुग्णालयांमध्ये हे मेडिकल डिव्हायसेस छापील किमतीपेक्षा अर्ध्या किमतीत याचा पुरवठा करण्यात येत आहे. रुग्णालयातील व्यवहारासंदर्भात काही तक्रार असल्यास हेल्पलाईनवर तक्रार करण्याची सुविधा असून,राज्यातील मोठ्या रुग्णालयात किंमतीवर नियंत्रण आणण्यासाठी उपाययोजना करीत असल्याचेही श्री. येरावार यांनी सांगितले.
यावेळी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटीलसदस्य सर्वश्री डॉ. जयप्रकाश मुंदडाअस्लम शेखसुनील प्रभूयोगेश सागर यांनी उपप्रश्न उपस्थित केला होता.

००००

No comments:

Post a Comment