Tuesday, 1 August 2017

उपलोकायुक्त डॉ. शैलेश शर्मा 22 व 23 ऑगस्ट रोजी नागपुरात

       नागपूर दि. 1 :  महाराष्ट्राचे उपलोकायुक्त डॉ. शैलेशकुमार शर्मा 22 व 23 ऑगस्ट रोजी नागपूर दौऱ्यावर येणार आहे. या दरम्यान ते लोकसेवका संबंधीच्या सामान्य नागरिकांकडून तक्रारी असल्यास सहायक प्रबंधक/ अधिकारी, विभागीय आयुक्त कार्यालय नागपूर येथे 22 व 23 ऑगस्ट रोजी दुपारी 3.30 व 4.30  या वेळात स्वीकारण्यात येईल.
            महाराष्ट्र लोकायुक्त आणि उपलोकायुक्त अधिनियम 1971 नुसार लोकसेवकांच्या विरोधातील, लोकसेवकांनी केलेली कारवाई किंवा त्यांची कार्यपद्धती ही अवाजवी, अन्यायी, जुलमी किंवा अनुचित भेदभाव करणारी असेल किंवा अशी कारवाई करण्यामध्ये त्यांच्याकडून हयगय, अकारण विलंबग झाला असेल व संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करून देखील सकारात्मक प्रतिसाद दिला गेला नसेल अशा तक्रारी पुष्ट्यर्थ दस्तऐवजांसह तसेच लोकसेवकांनी केलेल्या भ्रष्ट आचरणासंबंधीच्या व पदाचा गैरवापर केला असल्यास त्या संबंधीच्या तक्रारी लोकायुक्त कार्यालयामार्फत सोडविल्या जातात.   
****   

No comments:

Post a Comment