Tuesday, 1 August 2017

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

विभागीय आयुक्त कार्यालयात
 साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन
     नागपूर दि. 1 :  साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात आज त्यांना अभिवादन करण्यात आले. अप्पर आयुक्त आर. एस. जगताप यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
          यावेळी  भूसुधार आयुक्त सुधाकर कुळमेथे, उपायुक्त पराण सोमन, श्रीकांत फडके,  पी. एम. घाटे, सुधीर शंभरकर, सहाय्यक संचालक कमलकिशोर राठी, तहसिलदार संपत खलाटे, रविंद्र माने, नाझर प्रमोद जोंधुळकर यांच्यासह विभागीय आयुक्त कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
                                             जिल्हाधिकारी कार्यालय
जिल्हाधिकारी कार्यालयात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला  निवासी उपजिल्हाधिकारी  के.एन. के राव यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.  
            यावेळी उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी, श्रीमती मनिषा जयभाये, अधीक्षक प्रदिप कापसे, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती तेलमासरे  यांच्यासह कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
 **** 

No comments:

Post a Comment