Thursday, 3 August 2017

मध्यस्थी जनजागृती कार्यक्रम शनिवारी

     नागपूर, दि. 3 :   कौटुंबि‍क न्यायालय व कौटुंबिक न्यायालयीन वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने मध्यस्थी जनजागृती कार्यक्रम शनिवार, दिनांक 5 ऑगस्ट रोजी दुपारी 1.55 वाजता नागपूर कौटुंबिक न्यायालय, सुयोग इमारत येथे आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून प्रशासकीय न्यायमूर्ती बी. पी. धर्माधिकारी, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायामूर्ती झेड. ए. हक उपस्थित राहणार आहे. तर, मध्यस्थीचे  तज्ज्ञ प्रशिक्षक ॲड. अजय मेहता मार्गदर्शन करतील.
            कौटुंबिक न्यायालयातील मध्यस्थ, वकील व विवाह समुपदेशक यांच्याद्वारे मध्यस्थी प्रक्रियेवर आधारित लघुनाटिकेचे सादरीकरण आणि कौटुंबि‍क न्यायालयातून परत एकत्र नांदायला गेलेल्या जोडप्यांचा सत्कार करण्यात येण्यात आहे. कार्यक्रमाला सर्व पक्षकार, वकील, विधी शाखेचे विद्यार्थी यांना मध्यस्थी जनजागृती कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन कौटुंबिक न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश ई. म. बोहरी, समन्वयक सुभाष काफरे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment