नागपूर, दि. 31 : ग्राम विकास आणि महिला व बालविकास मंत्री श्रीमती पंकजा मुंडे यांचे रविवार, दिनांक 3 सप्टेंबर रोजी मुंबईहून रात्री 8.10 वाजता नागपूर विमानतळावर आगमन व रविभवकडे प्रयाण. रात्री रविभवन येथे मुक्काम.
सोमवार, दिनांक 4 सप्टेंबर रोजी सकाळी 8.00 वाजता मोटारीने नरखेड(जि. नागपूर) कडे प्रयाण. सकाळी 9.00 वाजता नरखेड तालुक्यातील जलालखेडा येथील विविध विकास कामांच्या भूमिपूजन व ‘महाराजस्व घरचलो अभियान’शुभारंभाच्या कामास उपस्थिती. सकाळी 9.30 वाजता मोटारीने त्यांचे मोर्शी (जि. अमरावती) कडे प्रयाण. अमरावती जिल्ह्यातील मोर्शी व वरुड येथील कार्यक्रमांना उपस्थित राहून त्यांचे वरुड येथून दुपारी 2.00 वाजता काटोल(जिल्हा नागपूर) कडे प्रयाण.
दुपारी 2.30 वाजता क्रीडा संकुल काटोल येथे आयोजित महिला बचत गट प्रशिक्षण मेळाव्यास उपस्थिती. दुपारी 4.00 वाजता काटोल तालुक्यातील लिंगापार्डी ते अमरगोंदी ग्रामसडक योजनेच्या रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी 5.00 वाजता मौ. कोढाळी, ता. काटोल (जि. नागपूर) येथील जाम नदी पुनरुज्जीवन कामाची व जलपूजन कार्यक्रमास उपस्थिती. रात्री 8.25 वाजता नागपूर विमानतळावरुन त्यांचे मुंबईकडे प्रयाण.
000000
No comments:
Post a Comment