बृहन्मुंबई महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयातील अतिविशेषकृत आणि विशेषकृत विभागातील सरळसेवेने भरावयाची सहयोगी प्राध्यापक व प्राध्यापक ही पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यकक्षेतून दोन वर्षाच्या कालावधीसाठी वगळण्यास राज्यमंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या कालावधीत ही पदे विभागामार्फत स्थापन करण्यात आलेल्या निवड समितीमार्फत भरण्यात येणार आहेत.
सध्या मुंबई महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयातील अतिविशेषकृत आणि विशेषकृत विभागातील सहयोगी प्राध्यापक आणि प्राध्यापक ही पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे विविध पदांच्या भरतीचा असलेला ताण लक्षात घेता ही पदे तातडीने भरण्यात असलेल्या अडचणी लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला. यानुसार विभागामार्फत स्थापन करण्यात येणाऱ्या निवडसमितीमार्फत ती भरण्यात येतील. ही दोन्ही पदे गट-अ संवर्गातील आहेत. आजच्या निर्णयाचा वैद्यकीय शाखेचे विद्यार्थी आणि रुग्णांना लाभ होऊ शकेल.
-----०-----
No comments:
Post a Comment