नागपूर, दि.20 : विदर्भातील पणन व प्रक्रिया सहकारी संस्थाकरिता एक
दिवशीय विभागीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा उद्या गुरुवार
दिनांक 21 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता सायंटीफीक सभागृह, लक्ष्मीनगर, नागपूर
येथे होणार आहे.
महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त
सहकार विभाग आणि महाराष्ट्र राज्य सहकारी संघ, पुणेच्या संयुक्त विद्यमाने आणि दि
विदर्भ को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लि. नागपूर यांच्या सहकार्याने ही
कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
कार्यशाळेचे उद्घाटन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या
हस्ते होणार आहे. तर अध्यक्षस्थानी दि विदर्भ को-ऑपरेटिव्ह मार्केटींग फेडरेशनचे
अध्यक्ष डॉ. राजेंद्र शिंगणे आहेत. कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे
अध्यक्ष ॲड . सुहास तिडके, महापौर नंदा जिचकार, आमदार सर्वश्री सुधाकर कोहळे,
प्रा. अनिल सोले, पणन संचालक डॉ.आनंद जोगदंड, अटल महापणन विकास अभियानाचे प्रमुख
व्याख्याते गणेश शिंदे यांचे मार्गदर्शन होणार आहे.
कार्यशाळेत पणन प्रक्रिया सहकारी संस्थेच्या अडीअडचणी,
उपाययोजना, व्यवसाय विकास कृती आराखडे आणि अटल महापणन विकास अभियानाबाबत
मार्गदर्शन करणार आहेत. ही कार्यशाळा नागपूर व अमरावती विभागातील खरेदी विक्री
सहकारी संस्था, पणन व प्रक्रिया सहकारी संस्थेच्या प्रतिनिधीकरिता विनामुल्य आहे.
विदर्भातील सर्व जिल्हा व तालुका सह.वि.वि.संघ, इतर पणन व प्रक्रिया संस्थेचे
पदाधिकारी, संचालक व व्यवस्थापक यांनी या कार्यशाळेत सहभागी होण्याचे आवाहन
महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा अप्पर निबंधक उत्तम
इंदलकर यांनी केले आहे.
****
No comments:
Post a Comment