Monday, 18 September 2017

राष्ट्रपतींचा दौरा पूर्वतयारीचा आढावा

नागपूर, दि. 18 :- राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या प्रस्तावित दौऱ्याच्या पूर्वतयारीस वेग आला आहे.
आज येथील विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत विभागीय आयुक्त अनूप कुमार यांनी पूर्वतयारीचा आढावा घेतला आणि संबंधित विभागांना आवश्यक सूचना दिल्या.
दौरा कालावधीतील रस्ते वाहतूक, विविध कार्यक्रमातील बैठकव्यवस्था, वाहने उभी करण्याची सोय, सुरक्षा व्यवस्था, वाहन व्यवस्था, दौऱ्याच्या दिवशीचा वीज पुरवठा या आणि अन्य अनुषंगिक बाबींवर बैठकीत चर्चा झाली.
या बैठकीला श्रीमती सुलेखा कुंभारे, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, महापालिका आयुक्त अश्विन मुदगल, सहपोलीस आयुक्त शिवाजीराव बोडखे यांच्यासह विविध सुरक्षा यंत्रणा, महसूल, सार्वजनिक बांधकाम विभाग, मिहान, विमानतळ यंत्रणा, राजशिष्टाचार विभाग, नागपूर मेट्रो इत्यादी विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

                                                                                                *****   

No comments:

Post a Comment