25 ते 30 सप्टेंबर
दरम्यान होणार भरती
नागपूर, दि. 18 : औरंगाबाद येथील 136
टी.एस.बटालियनच्या वतीने 25 ते 30
सप्टेंबर या कालावधीत पर्यावरणीय दलासाठी राज्यस्तरीय भरती होणार आहे. प्रादेशिक
सेनेतील या भरतीसाठी केवळ सैन्यदलातून निवृत्त झालेल्यांनाच अर्ज करता येणार असून
संपूर्ण महाराष्ट्र राज्यासाठी भरती होणार
आहे. भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार निवृत्त सैनिक असणे आणि महाराष्ट्र राज्यातील
रहिवासी असणे आवश्यक आहे. भरती प्रक्रिया विभागीय क्रीडा संकुल औरंगाबाद येथे
होणार आहे.
सैन्यातून निवृत्त
झाल्यानंतर 5 वर्षाच्या आतील सर्व जवान आणि जे सी ओ यांना अर्ज करता येणार आहे.
वयोमर्यादा याप्रमाणे-माजी सुभेदार 48 वर्ष, माजी नायब सुभेदार/हवालदार 45 वर्ष, माजी सैनिक 42 वर्षन्वयाच्या 50 वर्षापर्यंत त्यांना सेवा बजावता
येणार आहे. सेवानिवृत्तीवेळी कोणत्याही पदावरती असलेल्या उमेदवाराला शिपाई म्हणूनच
भरती केले जाईल तर ज्युनिअर कमिशंड ऑफिसर यांना नायब सुभेदार म्हणून भरती केली
जाणार आहे. सैन्य दलातून सेवानिवृत्ती झालेल्यांना पहिल्यांदा दोन वर्षासाठी रुजू
करुन घेण्यात येईल. त्यानंतर त्या व्यक्तीचे कार्य तपासून एक वर्षासाठी त्यात वाढ
करण्यात येईल. जर त्यांचे कार्य असमाधानकारक असेल तर कार्यमुक्त केले जाईल.
अर्जदार शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असणे अपेक्षित आहे तसेच त्याचे चारित्र्य
स्वच्छ असावे. अर्जदार विरोधात एफ.आय.आर/पोलीस तक्रार झालेली असून नये तसेच त्याला
कोणत्याही न्यायालयाने शिक्षा दिलेली असू नये.
एकापेक्षा अधिक विवाह
केलेल्यांचा अर्ज स्वीकारला जाणार नाही. अर्जदार केवळ महाराष्ट्र राज्यातील
रहिवासी असणे अपेक्षित आहे. भरती केवळ गुणवत्तेवर आणि उपलब्ध जागांच्या आधारावरच
केली जाणार आहे. या ठिकाणी झालेली सेवा कोणत्याही पेन्शनसाठी पात्र होणार नाही.
अपात्र आणि अयोग्य अर्जदारांना सेवेतून कमी केले जाईल. पात्र अर्जदारांची वैद्यकीय
चाचणी केली जाणार आहे.
त्यासाठी उमेदवारांची शारीरिक पात्रता उंची किमान 160 सेंटीमीटर, वजन किमान 50 किलो, छाती
82 सेंटीमीटर असावी. तसेच शारीरिक क्षमता चाचणीमध्ये 7 मिनीट 9 सेकंदामध्ये 1 मैल
धावण्याची क्षमता, लांब उडी, उंचीवरील मचाणांवर चालण्याची क्षमता, वयोमानानुसार
बिम हाताळण्याची क्षमता असावी. भरती प्रक्रियेत सैन्यदलातून निवृत्त झालेल्यांना
अर्ज करण्याचे आवाहन लेफ्टनंट कर्नल के. एस. चौहान यांनी केले आहे.
******
No comments:
Post a Comment