Saturday, 7 October 2017

अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटूंबातील लाभार्थ्यांसाठी शिधावस्तूचे किरकोळ दर



नागपूर, दि.7 :   राष्ट्रीय अन्न सुरक्षाअंतर्गत नागपूर शहर पुरवठा विभागाच्या कार्यक्षेत्रातील (नागपूर महानगरपालिका) सर्व पात्र अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटूंबातील लाभार्थ्यांसाठी शिधावस्तू वाटप व किरकोळ विक्री दर निश्चित करण्यात आले आहे.
प्राधान्य गटाकरिता प्रति व्यक्ती 3 किलो गहू व 2 किलो तांदूळ, तर अंत्योदय प्रति शिधापत्रिकाधारकाकरिता 20 किलो गहू व 15 किलो तांदूळचे वाटप दोन रुपये प्रति किलो गहू, तर तीन रुपये प्रति किलो तांदूळ किरकोळ दराने वितरीत करण्यात येणार, तसेच अंत्योदय शिधापत्रिकाधारकाकरिता एक किलो साखर वीस रुपये प्रति किलो दराने वितरण करण्यात येईल. असे अन्नधान्य वितरण अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
00000000

No comments:

Post a Comment