मुंबई, दि. 7 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित ‘दिलखुलास' कार्यक्रमात पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांची आकाशवाणीवरून मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत सोमवार दि. ९ आणि मंगळवार दि. १० ऑक्टोबर रोजी 'पर्यटन विकास' या विषयावर प्रसारित होणार आहे.
आपल्या राज्याला मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक साधनसंपत्तीचा वारसा लाभलेला आहे.या नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर पर्यटनासाठी करण्यासाठी शासन पुढाकार घेत असून पर्यटकाना पुरेशा सोयीसुविधा देण्यासाठी शासन विविध योजना राबवत असते. पर्यटन वाढीसाठी शासन करत असलेल्या प्रयत्नांविषयी सविस्तर माहिती श्री. रावल यांनी ‘दिलखुलास’ या कार्यक्रमातून दिली आहे. निवेदिका रूपलक्ष्मी शिंदे- चौगुले यांनी ही मुलाखत घेतली आहे.
००००

No comments:
Post a Comment