Saturday, 7 October 2017

नागपूर कारागृहातील बंदीच्या मृत्यू प्रकरणी दंडाधिकारीय चौकशी



नागपूर,दि.7 :  नागपूर मध्यवर्ती कारागृहातील मृतक बंदी क्रमांक सी-8655 आयुष निर्मल पुगलीया यांचा दिनांक 11 सप्टेंबर 2017 रोजी नागपूर मध्यवर्ती कारागृह येथे झालेल्या मृत्यूबाबतची दंडाधिकारीय चौकशीचे आदेश जिल्हादंडाधिकारी यांनी उपविभागीय दंडाधिकाऱ्यांना दिले आहे. नागपूर शहर उपविभागीय दंडाधिकारी शिरीष पी. पांडे हे कैद्याच्या मृत्यूबाबतच्या घटनेची कारणे व परिस्थिती, मृतकाच्या मृत्यूस कारणीभूत असलेली इतर संयुक्तीक कारणे याबाबीवर चौकशी करतील.
या घटनेची प्रत्यक्ष माहिती असणाऱ्या आणि चौकशीत भाग घेऊ इच्छिणाऱ्यांनी सर्व माहिती आणि सत्य परिस्थितीबाबत आपले लेखी निवेदन शपथपत्रासह दिनांक 25 ऑक्टोबर 2017 पर्यंत तहसिल कार्यालय नागपूर शहर येथील खोली क्रमांक 1 मध्ये सादर करावे, असे आवाहन उपविभागीय दंडाधिकारी शिरीष पी. पांडे यांनी केले आहे.
00000000

No comments:

Post a Comment