Monday, 13 November 2017

जात प्रमाणपत्र प्रस्ताव सादर करण्याची मुदत 16 डिसेंबरपर्यंत


       नागपूर, दि. 13 : बारावी विज्ञान आणि व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये शिकणाऱ्या सर्व अनुसूचित जाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गातील (वैद्यकीय, अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, बी. फॉर्म, एम.बी.ए, एम.सी.ए, बी.एड, बी.पी.एड, एम.एड, बी.एस.सी, नर्सींग, एल.एल.बी, इत्यादी) अभ्यासक्रमातील प्रथम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपले जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव संबंधीत महाविद्यालयामार्फत  किंवा प्राचार्यांच्या सही शिक्कयासह व आवश्यक त्या कागदपत्रांसह दिनांक 16 डिसेंबर 2017 पर्यंत स्वतकिंवा संस्थेमार्फत कार्यालयास सादर करावे.
            दिनांक 16 डिसेंबर नंतर येणारे प्रस्ताव स्विकारले जाणार नाही, असे आवाहन जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त तथा सदस्य आर. डी. आत्राम  यांनी केले आहे.

*****  

No comments:

Post a Comment